जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडवणार – स्मिताताई वाघ

0

जळगाव : उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्मिताताई वाघ यांनी दिले. जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत आयोजित उद्योजक मेळाव्यात सहभागी होऊन उद्योजकांशी संवाद साधला. याप्रसंगी राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन व शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी सुद्धा उद्योजकांना संबोधित करत त्यांच्या समस्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
जळगाव एमआयडीसीमधील उद्योजकांतर्फे उद्योजक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ना. महाजन, आ. भोळे व स्मिताताई यांनी उद्योजकांसोबत संवाद साधला. जिल्ह्यातील उद्योजकांना केंद्र व राज्य सरकारचे पाठबळ मिळाले तर जिल्ह्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होवू शकतो. यामुळे स्मिताताईंनी दुवा म्हणून काम करत शासन दरबारी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा उद्योजकांतर्फे व्यक्त करण्यात आली. यावेळी स्मिताताई म्हणाल्या की, मी राजकारणात येण्याच्या आधीपासून एक उद्योजिका होते. यासाठी मला उत्कृष्ठ उद्योजिका म्हणून शासनातर्फे गौरविण्यात आले आहे.

यामुळे उद्योजकांच्या अडचणी काय असतात व त्या कशा सोडविता येतात, याची मला माहिती आहे. यामुळे जिल्ह्यातील उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास माझे प्राधान्य राहिल, असे आश्वासन स्मिताताईंनी यावेळी दिले. यावेळी सर्व उद्योजकांनी महायुतीची उमेदवार व मा. नरेंद्रजी मोदींना पुन्हा पंतप्रधानपदी बसविण्यासाठी मतदानरूपी साथ देण्याचे आश्वासन दिले यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीषभाऊ महाजन, आमदार राजूमामा भोळे, उज्वलाताई बेंडाळे, अरुणदादा बोरोले, कंवरलालजी संघवी, डॉ. राधेश्याम चौधरी, कांतीलाल सानप, केतकीताई पाटील, सुनिलजी, रावजी लठी, समीर साने, संतोष रगडे, बंडूदादा काळे, चंद्रकांतदादा बेंडाळे, अरविंद देशमुख, किशोर काळे यांसोबत सर्व उद्योजक व महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.