समता नगर खूनप्रकरणी दोन आरोपी जेरबंद

0

जळगाव ;- शहरातील समता नगर परिसरातील अरुण सोनवणे खून प्रकरणातील दोन संशयित आरोपी जेरबंद झाले आहेत. यातील एका संशयितास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्यप्रदेशातून अटक केली आहे. अशोक महादु राठोड (रा.झाकिर हुसैन कॅालनी,संत गाडगेबाबा चौक, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. या घटनेप्रकरणी रामानंद नगर पोलिस स्टेशनला पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यापूर्वी एलसीबीने नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी येथून सोनू आढाळे याला अटक केली आहे. तर दुसरा अटक करण्यात आलेला अशोक महादू राठोड यास एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने मध्य प्रदेशातील नेपानगर येथून अटक केली आहे. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, किशोर पाटील, नाना तायडे, किरण पाटील, रामानंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक हेमंत कळस्कर, विजय जाधव आदींनी त्याला ताब्यात घेत रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता तिन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलिस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.