ब्रेकिंग: CBSE दहावी-बारावी परीक्षेची तारीख जाहीर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 13 मार्च 2024 तसेच बारावीची परीक्षा 15 मार्च ते 2 एप्रिल 2024 या कालावधीत होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी 10 वीची परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च रोजी होईल. तर 12 वीची 21 फेब्रुवारी ते 23 मार्च 2024 रोजी होणार आहे.

https://x.com/ANI/status/1734545538555773229?s=20

 

सीबीएससीनं दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, १५ फेब्रुवारी २०२४ पासून या परीक्षेला सुरुवात होणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रकही सीबीएससीकडून प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सीबीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन विद्यार्थ्यांना ही डेटाशीट तपासता येणार आहे.

१५ फेब्रुवारी २०२४ रोजी दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार असून ती १३ मार्च २०२४ पर्यंत चालणार आहे. सकाळी १०.३० वाजता पेपर्सना सुरुवात होणार आहे. देशभराती सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा या वेळापत्रकानुसार पार पडणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.