सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांची एक लाखांची रोकड लांबवली

0

अमळनेर :-– मुलांना पैसे पाठवण्यासाठी भरणा करायला गेलेल्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचे १ लाख रूपये चोरट्यानी लांबवल्याची घटना ११ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेत घडली. याबाबत अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे.

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अर्जुन आत्माराम बोरसे याना सेवनिवृत्तीची रक्कम मिळाली होती. त्यातून त्यांनी पत्नीला दागिने घेतले होते. मात्र मुलगा आणि मुलगी यांना पैसे पाठवायचे असल्याने त्यांनी दागिने मोडून मिळालेली १ लाख ४५ हजार रूपये रक्कम ११ रोजी दुपारी १२ वाजता पिशवीत घेऊन स्टेट बँकेत भरणा करायला गेले होते. सुरुवातीला मुलीच्या खात्यावर ४५ हजार रूपये भरले आणि तेव्हढ्यात तेथे जवळच असलेल्या चोरट्यांनी १ लाख रुपयांची पिशवी लांबविली.

अर्जुन बोरसे यांनी पोलिसांना माहिती दिली. अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक विजय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसाटे, हेडकॉन्स्टेबल शरद पाटील यांनी भेट देवून बैंक व बाहेरील सीसीटीव्ही फुटेज तपासले, तसेच चोरट्यांचा आजूबाजूला शोध घेतला. मात्र चोरटे मिळून आले नाहीत. दरम्यान, अर्जुन बोरसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.