क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील बेपत्ता…

0

 

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पुण्यातील कोथरूड भागातून आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास टीम इंडियाचा क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील बेपत्ता झाले आहेत. केदार जाधवचे वडील महादेव जाधव गायब झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केदार जाधव याचं कुटुंब कोथरूड भागात राहतं. महादेव जाधव आज सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास रिक्षाने बाहेर गेले, पण आतापर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही. महादेव जाधव यांच्याजवळ असलेला फोनही बंद आहे. केदार जाधवच्या कुटुंबाने पोलिसांकडे महादेव जाधव हरवल्याची तक्रार दिली आहे. आता पोलीस महादेव जाधव ज्या रिक्षेने गेले, त्या रिक्षाचालकाचा शोध घेत आहेत. रिक्षाचालकाचा शोध लागल्यानंतर केदार जाधवचे वडील रिक्षेतून नेमके कुठे उतरले आणि नंतर कुठे गेले, याचा शोध घेणं पोलिसांना सोपं जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.