Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार
    • पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले
    • मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक
    • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या खाजगी विमानात बिघाड
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»जागतिक रंगभूमि दिवसानिमित्त बालगंधर्व नाट्यगृहात रंगभूमी पूजन
    मनोरंजन

    जागतिक रंगभूमि दिवसानिमित्त बालगंधर्व नाट्यगृहात रंगभूमी पूजन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 27, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

    रंगभूमी ही अशी जादूई जागा आहे, जिथे काल्पनिक विश्व प्रेक्षकांसमोर मांडलं जातं. कधीकधी माणसाला वास्तवाचा आरसा दाखवण्याचं काम देखील रंगभूमीवरील कलाकृती करतात. रंगभूमीवर कलाकृती सादर करुन कलाकार रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. जगातील सर्व रंगभूमींमध्ये आदानप्रदान व्हावे या हेतूने १९६२ पासून जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात येतो. आज (दि.२७) मार्चला बालरंगभूमी परिषद व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद जळगाव जिल्हा शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व खुले नाट्यगृहात जागतिक रंगभूमी दिन साजरा करण्यात आला.

    यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी व चिंतामण पाटील यांच्याहस्ते नटराज व रंगमंच पूजन करण्यात आले. यावेळी बोलतांना चिंतामण पाटील म्हणाले की, जागतिक रंगभूमी दिन हा दिवस साजरा करण्याचा निर्णय १९६१ मध्ये इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने घेतला.  यानिमित्ताने दरवर्षी जागतिक रंगभूमी दिनाचा संदेश एखाद्या देशाच्या नाट्य कलावंताकडून दिला जातो. १९६२ मध्ये, फ्रान्सचे जीन कॉक्टो हे आंतरराष्ट्रीय संदेश देणारे पहिले कलाकार होते. पहिले नाटक अथेन्समधील एक्रोपोलिस येथे असलेल्या डायोनिससच्या थिएटरमध्ये घडल्याचे सांगितले जाते. हे नाटक पाचव्या शतकाच्या सुरुवातीचे मानले जाते. यानंतर थिएटर संपूर्ण ग्रीसमध्ये वेगाने पसरले.

    त्यानंतर डॉ.हेमंत कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, रंगभूमीकडे वळणारी नवी पिढी नवे प्रयोग करायला एकत्र येत आहेत. हौशी तरुण कलाकारांचे ग्रूप ठिकठिकाणी फुलत आहेत. कलेचा आनंद तर त्यांना या नाटकवेडातून मिळतोच पण जीवनाचं तत्त्वज्ञान सोप्या भाषेत नाटकामुळं शिकता येतं. जुन्या रंगकर्मीनी दिलेली शिकवण आणि नाटकांची परंपरा पुढे वेगळ्या आयामाने पुढे नेण्याचा प्रयत्न आजची तरुणपिढी जोमाने करत आहे.

    याप्रसंगी जळगावातील रंगकर्मी प्रा.राजेंद्र देशमुख, पियुष रावळ, अविनाश चव्हाण, योगेश शुक्ल, सचिन चौघुले,  आकाश बाविस्कर, किरण अडकमोल, धनंजय धनगर, गौरव लवंगाळे, अमोल ठाकूर, ज्ञानेश्वर सोनार, कुंदन इंगळे आदी उपस्थित होते.

    jalgaon Rangabhumi Din World Theatre Day
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आदीत्य जीवने यांनी घेतला आयुक्तपदाचा पदभार

    June 11, 2026

    पाचोरा तालुक्यात वाळू माफियांचे धाबे दणाणले

    June 11, 2026

    मंत्र्यांना शेतकऱ्यांसाठी वेळ नाही : खडसे आक्रमक

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif