KBC लॉटरीच्या नावाखाली महिलेची फसवणूक

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

ऑनलाईन फसवणुकीचे (Online fraud) प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. जळगाव (Jalgaon) शहरातील योगेश्वर नगर येथील रहिवासी असलेल्या कांचन आसाराम मासरे (वय २९) यांना लॉटरी लागल्याचे सांगून ५१ हजार १५० रुपयात ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

२७ ऑक्टोबर रोजी दुपारी कांचन मासरे यांना एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. तुम्हाला २५ लाखांची लॉटरी लागली असल्याचे सांगितले. मात्र त्यावेळी कांचन यांना हे सर्व खोटे वाटल्याने त्यांनी सदर कॉल कट केला. नंतर पुन्हा दुसऱ्या क्रमांकावरून कॉल आला व व्हॉट्सअॅपवर कंपनीचे पॉम्प्लेट टाकल्याचे सांगितले.

त्यांनी केबीसी (KBC Lottery) असे नाव असल्याने कांचन यांचा समोरील व्यक्तीवर विश्वास बसला. त्यामुळे समोरील व्यक्ती सांगेल त्याप्रमाणे कांचन व त्यांचे भाऊ अजय बनवारी यांनी वेळोवेळी सुंदरम कुमार व गुड्डू कुमार यांच्या अकाऊंटवर ५१ हजारे १५० ऑनलाईन पाठविले. समोरील व्यक्ती काहीही कारण सांगून वारंवार पैशांची मागणी करीत होती. मात्र लॉटरीचे पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानुसार सुंदरम कुमार व गुहू कुमार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.