विरोधी पक्षनेत्यांची आरोप आणि प्रत्यारोप कायम; कसबा, चिंचवड विधानसभा

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक सुरु झाल्या आहेत. सोबतच विरोधी पक्षनेत्यांची आरोप आणि प्रत्यारोप सुद्धा कायम आहे. सकाळी ७ वाजेपासून निवडणुकीस सूरूवात झाली आहे. कसबा आणि चिंचवडच्या जागा भारतीय जनता पक्षाच्या आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या निधनामुळे रिक्त झाल्या आहेत. पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपचे हेमंत रासणे आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. तर चिंचवडमध्ये देखील भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्यात लढत आहेत.

चिंचवड पोटनिवडणुकीत धक्काबुक्की झाल्याची चर्चा आहे. यावर संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, धक्काबुक्की होईल, वाद होतील. कारण सरकारकडून पाच ते सहा मंत्री मतदार संघात जाऊन बसले आहेत. याची काही गरज आहे का?. प्रशासनावर. यंत्रणांवर दबाव आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पराभवाची भीती दिसली की लोकांना गोंधळ घालण्यास प्रवृत्त केल्या जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.