अंजाळे येथील कोतवाल यांना वाळूमाफियांकडून बेदम मारहाण

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील अंजाळे गावातील कोतवाल याला वाळु माफीया कड्डन तलाठी कार्यालयात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असुन, या घटनेमुळे महसुल प्रशासनात संतप्त प्रतिक्रीया देण्यात येत आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, अंजाळे तालुका यावल येथे कोतवाल म्हणुन कार्यरत असलेले ओकार लिलाधर सपकाळे हे दिनांक २५ फेबुवारी रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास अंजाळे येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाज करीत असतांना ९ ते १० वाळु माफीया यांनी कार्यालयात घुसून अंजाळे येथील ओंकार सपकाळे यांना आमच्या विरुद्ध तक्रार का दिली असे जाब विचारत त्यांना लाकडी दांड्यानी बेदम मारहाण करीत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला.

याबाबत यावल तालुका तलाठी व कोतवाल संघटनेच्या वतीने प्रशांत सरोदे, व्ही.एस.आढाळे, पि.एम.तावडे, विजय साळवे, निनेश आर गायक्वाड, व्ही एल सोळंके यांच्या स्वाक्षरीचे निवेदन पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांना देण्यात आले असुन, मुजोर झालेल्या वाळु माफिया विरूद्ध तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आली असुन, या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांनी दिली. मुजोर अवैध वाळू वाहतूकदार धनराज शांताराम सपकाळे, सागर निवृत्ती तायडे, देवानंद अशोक शंकपाळ, तुकाराम शांताराम सपकाळे, देवेश शशिकांत सपकाळे, सर्व राहणार अंजाळे तालुका यावल यांच्या विरोधात 353.332.324.323.143.147.504.506.427 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजाळे सह परिसरात या वाळू माफियांची दादागिरी वाढली असून शासकीय कार्यालयात घुसून एका कर्मचाऱ्यास मारहाण करण्यात इतकी धमक त्यांच्यात निर्माण झाली आहे. या अवैध वाळू माफियांवर वरदहस्त कोणाचा याचा देखील शोध घेणे गरजेचा आहे. या सर्व घटनेनंतर प्रांत अधिकारी कैलास कडलक, तहसीलदार महेश पवार काय कारवाई करतात यावर सर्व तालुका वासियांचे लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.