“नागराज मंजुळेंच्या” गाण्याने तेलुगू आणि तामिळ चित्रपटसृष्टीला घातली भुरळ

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

नागराज पोपटराव मंजुळे (Nagraj Poptrao Manjule) दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची गाणं चाहत्यांना वेड लावत आहे. सोशल मीडियावर या गाण्याला ३ मिलियनहूनही अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेक तरूण तरूणी आपल्या प्री वेडिंग शूटसाठीही या गाण्याचा वापर करत आहेत. मराठी प्रेक्षकांच्या मनात घर केल्यानंतर आता हे प्रेमगीत तेलुगू आणि तामिळ भाषेतही आपल्या भेटीला आलं आहे.

झी स्टुडिओज (Zee Studio) आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, हेमंत जंगल अवताडे दिग्दर्शित ‘घर बंदूक बिरयानी’ चित्रपटातील ‘गुन गुन’ या हळुवार प्रेम फुलवणाऱ्या गाण्याने अल्पावधीतच संगीतप्रेमींना आपलंस केलं.तेलुगूमधील ‘गुन गुन’ या गाण्याला चंद्रबोस यांचे बोल लाभले असून तामिळमधील गाण्याला युगभारती यांनी शब्दबद्ध केले आहे. या दोन्ही भाषेतील गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी संगीत दिले असून प्रेमाची तरल भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्याला अनुराग कुलकर्णी आणि अदिती भावराजू यांच्या आवाजाने अधिकच रंगत आणली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.