उपकर्णधार पदापरून “के एल राहुलची” हकालपट्टी

0

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क

बऱ्याच दिवसापासून के एल राहुल वरून वाद सुरु होते. त्याची कामगिरी चांगली नसून सुद्धा त्याला टीम मध्ये खेळण्याची परवानगी दिली गेली होती. यावरून के एल राहुल (KL Rahul) चांगलाच ट्रोल झाला होता. एवढाच नाही तर त्याच्यावरून माजी खेळूनचे सुद्धा शाब्दिक भांडण सोशल मीडियावर बघायला मिळाले होते. आता त्याच संदर्भात माहिती समोर येत आहे. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत (Border Gavaskar Test Series) भारतानं 2-0 ने आघाडी घेतली आहे. आता तिसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) दृष्टीने महत्त्वाचा आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मात असलेल्या केएल राहुलची चर्चा रंगली आहे. बॅटमधून धावा येत नसताना संघात स्थान मिळाल्याने टीकेचा धनी ठरला आहे. वेंकटेश प्रसादसह माजी खेळाडूंना त्याच्यावर टीका केली आहे. आणि आता त्याला उपकर्णधार पदावरून पायउतार करण्यात आले आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात उपकर्णधार कोण असेल याबाबतचा निर्णय बीसीसीआयनं कर्णधार रोहित शर्माकडे सोपवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासोबतच उपकर्णधार पद कोणाकडे जाते या कडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.