साथ द्या.. विकास घडवू- एकनाथराव खडसे

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जनसंवाद यात्रेदरम्यान मानमोडी येथे संवाद साधताना वाढत्या महागाईबद्दल एकनाथराव खडसे यांनी केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. एकनाथराव खडसे म्हणाले ‘आता वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महेंगा तेल ‘ असे म्हणण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. आतापर्यंतच्या 35 ते 40 वर्षांच्या राजकारणात कधीच जातीपातीचं राजकारण केलं नसून सर्व माळी, कोळी, बौद्ध, भिल्ल, फास, पारधी अशा सर्वांनाच सोबत घेऊन काम करीत आलो आहे. त्यामुळे मी अनेक वेळा माझ्या भाषणामधून बोलुन दाखवलं आहे की, या सर्व जाती समावेशक लोकांकडून मला मनापासून प्रेम मिळालं आहे, म्हणून नाथाभाऊ इतका भाग्यवान माणूस दुसरा कोणी नसेल. नाथाभाऊनी त्यांच्या आयुष्यात फक्त विकासाचं राजकारण केलं, मतदार संघात कायम शांतता ठेवली, गुंडागर्दी नावालाही नव्हती, मात्र दुर्दैवाने गेल्या तीन वर्षात गुंडागर्दीने डोके वर काढले असून गावागावात दारू विक्रीने कहर केल्याने अनेकांचे संसार उध्वस्त होत असल्याबदल दुःख व्यक्त केलं.

आता खोके सरकार असल्याने त्यांना जनसामान्यांशी काही घेणं देणं राहिलं नाही अशी टीका करत आपले आमदारसाहेब स्थगिती आमदार असून मी आणलेल्या विकास निधीला स्थगिती देण्याचं पाप करीत असल्याचा आरोप केला. भविष्यात आदरणीय पवार साहेबांची ताकद वाढवण्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस बळकट करण्यासाठी आणि खास करून विकासासाठी साथ द्या. असे आवाहन आ खडसे यांनी केले.

प्रसंगी बोदवड तालुक्यातील जनसंवाद यात्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यामुळेच अतिशय यशस्वी रित्या पार पडली. यात्रेच्या समारोपाचे उत्कृष्ट नियोजन करून भव्य दिव्य सांगता केल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन केले. याआधी यात्राप्रमुख ईश्वर रहाणे यांनी संवाद यात्रेचा उद्देश स्पष्ट करून नाथाभाऊ आणि भैय्यासाहेब एकत्र आल्याने राष्ट्रवादीची ताकद आता दुपटीने वाढली असून भावी आमदार रोहिणीताईच राहतील असा विश्वास व्यक्त करून मतदार संघातील जुने- नवे असा वाद मिटल्याचे स्पष्ट केले. तर ज्यांना निवडून दिले ते खोके घेऊन आरामात बसले आहेत आणि जे पराभूत झाले आहेत, ते गावागावात जाऊन मतदारांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेत असल्याचे कैलास चौधरी यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले.

मानमोडी येथे फुलांचा वर्षाव करून आणि प्रचंड आतिषबाजी करून जल्लोषात जनसंवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले. तसेच गावकऱ्यांच्या वतीने सर्व पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.

बाकी लोकांना पाय ठेवायलाही जागा राहणार नाही – रविंद्र पाटील

“मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षात जे चित्र होतं, “नाथाभाऊ विरुद्ध भैय्यासाहेब, अर्थातच भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी “हे चित्र आता बदललं आहे. बोदवड तालुक्यातील बहुतांश मतदार हा कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठीशी उभा राहीला. उर्वरित मतदार नाथाभाऊच्या पाठीशी आहेत. आता मात्र नाथाभाऊ आणि भैय्यासाहेब एकत्र आल्याने बोदवड तालुक्यात 100% राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निर्माण झाली आहे. आगामी पं. स., जि. प., मार्केट कमिटी या सर्वच निवडणुकीत फक्त राष्ट्रवादीचाच बोलबाला राहील, बाकी लोकांना पाय ठेवायलाही जागा राहणार नाही.” असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रविंद्र पाटील यांनी मानमोडी ता बोदवड येथे केले.

प्रसंगी भाऊ आणि मी जरी आतापर्यंत विरोधात लढत असलो तरी विकासासाठी मतभेद विसरून कायम एकत्र आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रसंगी एका जि. प. निवडणुकीत तळवेलचे नारायणदादा यांचे विरोधात निवडणूक लढवत असताना मला मानमोडी गावातून 390 पैकी 380 इतकी भरभरून मते दिल्याची आठवण करून देत, मी कायम मानमोडीकरांचा ऋणी राहील असे सांगून या गावात बूथचे पैसे लागत नाही, फक्त प्रेम लागतं. असा उल्लेख करून ग्रामस्थांचे अभिनंदन केले.

आदर्श गाव म्हणून मानमोडीची ओळख तालुक्याला झाली. पण गावाला आदर्श करण्यासाठी, गावाच्या विकासासाठी आबा, सतीश आणि निलेश काय काय, कसं कसं मॅनेज करून निधी खेचून आणतात याबद्दल आश्चर्य वाटते असे सांगून या तिन्ही जबाबदार पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले, आता बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी संबंधितांना केले.

प्रसंगी बोदवड तालुक्यासाठी पिण्यासाठी आणि शेतीसाठी कायम स्वरूपी योजना कराव्याच लागतील असे सांगून यासाठी नाथाभाऊनी विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती आ. खडसे यांना केली. केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकार शेतकरी, कष्टकरी आणि जनहित विरोधी असून या सरकारला शेतकरी, शेतमजूर कंटाळले आहेत. त्यामुळे आता परिवर्तन अटळ असून आगामी काळात राष्ट्रवादीचेच सरकार येईल, असा विश्वास रविंद्र पाटील यांनी व्यक्त केला.

देशात आदरणीय पवार साहेबांकडे शेतकरी मोठया आशेने पाहत आहे, कारण राष्ट्रवादी हाच मुळात शेतकरी, कष्टकऱ्यांचा पक्ष आहे. आतापर्यंत
शरद पवार यांनी प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. म्हणून सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सभासद होऊन शरद पवार यांची ताकद वाढवावी असे आवाहन रविंद्र पाटील केले.

याआधी रोहिणीताईंनी राष्ट्रवादी हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष असून शरद पवार यांनी महिलांना आरक्षण दिल्याने स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना संधी मिळत असल्याचे स्पष्ट केले. प्रसंगी बोदवड तालुक्यातील संवाद यात्रेनिमित्त करण्यात आलेल्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल टीम बोदवडचे म्हणजेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करून यापुढेही कायम अशीच साथ द्या असे आवाहन केले. संवाद यात्रेतून जबाबदारीची जाणीव झाली, आपलं इतकं प्रेम मिळालं कि त्या प्रेमाने मी खूप भारावून गेले त्यामुळे माझा पराभव झाला आहे असे कधी वाटलेच नसल्याचे रोहिणीताईंनी स्पष्ट केले. याआधी यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे यांनी मनोगत व्यक्त केले.

राष्ट्रवादी जनसंवाद यात्रेच्या सदतिसाव्या दिवशी बोदवड तालुक्यातील मानमोडी, घाणखेडा, सुरवाडे बुद्रुक, सुरवाडे खुर्द येथे आ. एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे यांनी ग्रामस्थांसोबत संवाद साधला.

यावेळी यात्रा प्रमुख ईश्वर रहाणे, निवृत्ती पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष यु. डी. पाटील, बोदवड तालुकाध्यक्ष आबासाहेब पाटील, जामनेर तालुका अध्यक्ष विलास राजपुत, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, कैलास चौधरी, रामदास पाटील, रामभाऊ पाटील, अनिल वराडे, भागवत टिकारे, प्रदिप बडगुजर, भरतअप्पा पाटील, निलेश भाऊ पाटील, किशोर गायकवाड, गणेश पाटील, दिपक पाटील, वामनराव ताठे, ज्ञानेश्वर पाटील, मधुकर पाटील, रामराव पाटील, विजय चौधरी, प्रमोद धामोळे, गोपाळ गंगतिरे, प्रमोद शेळके, जाफर शेख, कालू मेंबर, फिला राजपुत, नाईम खान, फिला राजपूत, चंद्रकांत देशमुख, कल्पेश शर्मा, रविंद्र खेवलकर, बाळाभाऊ भालशंकर, किरण वंजारी, सलाम शेख, अजयसिंग पाटील, राजेंद्र काळे, बबलू पाटील, श्रीकांत कोळी, भैय्या पाटील, चेतन राजपुत या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह घाणखेडा येथील सरपंच पल्लवी किनगे, सचिन करांडे, प्रविण करांडे, दिनकर पाटील, प्रल्हाद किनगे, गजानन सोनवणे, सोपान वाघळे, संजय करांडे, बाळकृष्ण करांडे, अनंता करांडे, शर्मा ताई, श्रीकृष्ण तायडे, अनिल सरोदे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सुरवाडे बु. येथील सरपंच श्रीकांत कोळी, राजेंद्र काळे, उत्तमराव बेलदार, अनिल बेदरकर, भागवत कोळी, दिपक पाटील, गणेश सुरवाडे, बबलू पाटील, नरेंद्र सुरवाडे, निवृत्ती कोळी, सदाशिव राऊत, गजानन कुंभार, सुनिल पाटील, सचिन कोळी, राजू कोळी, सोपान कोळी, ज्ञानेश्वर पाटील, कैलास चौधरी, गजानन पाटील, लालचंद पाटील, योगेश पाटील, अनिल कोळी, विजय कोळी, बिरबल सुरवाडे, योगेश राणा, प्रकाश कोळी, गंगाराम पाटील, मोहन कोळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

सुरवाडे खु येथिल नामदेवराव पाटील, गणेश शेळके, सरपंच ज्ञानोबा पाटील, निलेश शिंदे, देविदास पाटील, सुनिल गावंडे, तुळशीराम मोरे, ओंकार पाटील, सुखाराम जवरे, रंगनाथ शिंदे, प्रमोद शेळके, सोपान बरकले, संजय साळुंखे, सुरेश बिजागरे, प्रकाश बावस्कर, ज्ञानोबा शेळके आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

मानमोडी येथील समाधान वाघ, मोहन वाघ, भारत गाडेकर, मोरेश्वर पाटील, कैलास पाटील, पंकज पाटील, धनंजय पाटील, संजय बेलदार, नितीन कोळी, सचिन बावस्कर, जगदीश पवार, सुनिल वराडे, समाधान पाटील, योगेश पाटील, समाधान जगन्नाथ पाटील, गजानन कोळी, रमेश कोळी, तेजस कोळी, तुषार पाटील, वैभव पाटील, मनोज कोळी आदी ग्रामस्थाची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.