पुन्हा वाद पेटणार ! राज्यपाल कोश्यारींचे वादग्रस्त विधान

0

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे त्यांच्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असतात. पुन्हा एकदा राज्यपाल कोश्यारी यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल नवं विधान केलं आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा वाद पेटण्याची शक्यता आहे.

आज औरंगाबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये दीक्षांत समारंभ सोहळा (Dr. Babasaheb Ambedkar University) पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) उपस्थितीत होते. यावेळी बोलताना राज्यपालांनी नव विधान केलं आहे.

कोश्यारी म्हणाले की, ‘आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ.गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं विधान राज्यपालांनी केलं आहे. त्यांच्या विधानामुळे वाद पेटण्याची शक्यता आहे.

तसेच राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील, शिवाजी तर जुने झाले आहे. नवीन काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत हिरो इथंच मिळतील’ असं म्हणत राज्यपालांनी महापुरुषांची तुलना गडकरी आणि पवारांसोबत केली. ‘तुम्ही नवे विद्यार्थी आहात. लवकरच नव्या आयुष्यात प्रवेश करणार आहात. नवीन काही लक्ष्य समोर ठेवणार असाल तर पवार साहेब आणि गडकरी हे व्हिजनरी आहे. दोन्ही नेते संकल्प शक्ती आहे, व्हिजनरी आहे, सोबत गडकरी हे तर मिशनरी आहे, ते एकदा मागे लागेल तर काम केल्याशिवाय मागे हटत नाही’ असंही राज्यपाल म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.