स्व.बापुजी प्रिमियर लीग शनिवारपासून सुरु…

0

 

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

स्व.बापुजी युवा फाऊंडेशन तर्फे आयोजित बापुजी प्रिमियर लीग-२०२२ या क्रिकेट स्पर्धेला दि.१९ नोव्हेंबर २०२२ शनिवार पासून भडगाव – पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करून क्रिकेट सामान्यांना सुरुवात करण्यात आली.

स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे संस्थापक लखीचंद पाटील यांनी आ. किशोर पाटील यांचे स्वागत केले. यानंतर आ. किशोर पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी युवराज पाटील, अनिल वाघ, भुरा पाटील, डॉ.वसिम मिर्झा, डॉ.विलास पाटील, महेंद्र ततार, उमेश महाजन, जितेंद्र पाटील, विजय चौधरी तसेच स्व.बापुजी युवा फाऊंडेशनचे संचालक हर्षल पाटील, पिंटू मराठे, गणेश पाटील, निलेश पाटील, प्रशांत (बंटी) सोनार, चेतन राजपुत, किशोर राजपुत, हर्षल राजपुत, जितेंद्र (बबलू) पाटील, वाल्मीक पाटील, दुर्गेश वाघ, भैय्या पाटील, अमोल पाटील, प्रशांत गालफाडे, प्रथमेश पाटील, कुणाल भदाने, तुषार राजपुत, तेजस पाटील, बबलू महाजन, दिग्विजय राजपुत, गोपी पाटील, यश बिरारी, भोला पाटील, सुदर्शन कोळी, मयूर महाजन व सर्व सदस्य आणि क्रिडा- क्रिकेट प्रेमी उपस्थित होते. तसेच सूत्रसंचलक प्रविण महाजन यांनी केले. क्रिकेट प्रिमियर लीगसाठी किशोर पाटील, विनोद महाजन, अनिरुद्ध ठाकरे, स्वप्निल परदेशी, मोसिम शेख, शरद हिरे यांनी सहकार्य केले.

Leave A Reply

Your email address will not be published.