बी.एल.ओ यांची शिबिराला पाठ; मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे कानाडोळा…

0

 

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२३ जाहिर झाला आहे. मात्र याकडे मनवेल येथील बी.एल.ओ. यांनी दुर्लक्ष करत असल्याने, अनेक मतदारांना कागदपत्रे घेऊन भटकंती करावी लागत आहे. बी.एल.ओ. यांनी विशेष कार्यक्रमाला मात्र पाठ फिरवली असल्याचे एकंदरीत चित्र आहे. यावर यावल तहसिलदार कोणती कारवाई करतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र मार्फत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२३ या कालावधीत ०९ नोव्हेंबर ते ०८ डिसेंबर २२ या कालावधीत सक्षम लोकशाहीची पहिली पायरी – मतदान नोंदणी अभियान अंतर्गत १९ व २० डिसेंबर २०२२ या दोन दिवस मतदान यादी करीता विशेष शिबीर आयोजित केले असून सुध्दा याकडे मतदान नोंदणी अधिकारी (बी.एल.ओ.) यांनी शिबीराकडे पाठ फिरवल्याने दुर्लक्ष केले असल्याचे दिसून आले.

मनवेल येथे दोन मतदान यादीत नाव नोंदणी करण्यासाठी दोन बुथ आहे. यात मतदान यादी भाग क्रमांक ३१२ मध्ये मतदान यादीत नाव नोंदणी सुरु होते, तर ३१३ मध्ये मात्र नाव नोंदणी करीता बी.एल.ओ. शाळेत कधी येणार याची प्रतिक्षा सर्व मतदार करीत होते. दुपार पर्यंत आलेच नसल्यामुळे नव मतदारांना माघारी घरी जावे लागले.

विशेष मोहिमेत शनिवार व रविवारी विद्यार्थी, दिव्यांग, महिलांकरीता खास शिबीर आयोजित केले जाते मात्र मतदान नोंदणी अधिकारी यांच्या मनमानीमुळे अनेक मतदार मतदान यादीत नाव नोंदणी पासून वंचित राहिल्याचे दिसून आले.

मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मतदान नोंदणी अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.