लग्नाचे आमिष देत १६ वर्षीय मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल

0

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

१६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटूंबासोबत राहते. त्याच गावातील राहणारा संशयित आरोपी जगदीश अशोक पवार याने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार सहन न झाल्याने पीडित मुलीने आपल्या नातेवाईकांना सांगितला.

दरम्यान पीडित मुलीने पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी जगदीश अशोक पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.