जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क
भारतीय सैन्य दलातील भरती प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजपा सरकारने नुकतीच “अग्नीपथ” योजना जाहीर केली. त्यामुळे देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होऊन त्यांचे आयुष्य अंधाराच्या खाईत लोटले गेले आहे. देशात या योजनेच्या विरोधात कॉंग्रेस कडुन देशव्यापी आंदोलन केले जात आहे. अशी अन्यायकारक अग्नीपथ योजना त्वरित रद्द करण्यात यावी. व देशातील तरुणांचे भविष्य वाचवावे. यासाठी जामनेर तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जामनेर तालुकाध्यक्ष डॉ. शरद त्र्यंबक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देऊन एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
त्यावेळी गणेश झाल्टे, डॉ. ऐश्वर्री राठोड, मुलचंद नाईक, ज्ञानेश्वर पाटील, प्रवीण पाटील, शरद पवार, दत्ता इधाटे, विश्वनाथ पाटील, पंढरी टहाकळे, प्रमोद चित्रांग, श्रीकांत पाटील, अ. रउफ शे. महेमुद, सोनुसिंग राठोड, सिद्धार्थ वाघ, गुलाम हुसैन, गोपाल भोई, शिवाजी पाटील, मुसा फत्तु पिंजारी, रामचंद्र सोनवणे, कुर्बान शाह दिपक पाटील, रफिक मुल्लाजी,नाना पाटील, वी. वी. पाटिल, नामदेव जाधव, सुधाकर चौधरी, भावसिंग राठोड, राजेंद्र नाईक, भुषण चिमणकर, जगदीश गायकवाड, सुरेश थेटे धनसिंग राजपूत, अमित पाटील, तसेच यांच्या सह जामनेर तालुका कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.