मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी आनंदाची बातमी दिली आहे. यांच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहूण्याचे आगमन होणार आहे. नुकताच आलियानं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया आणि रणबीर दिसत आहेत.
https://www.instagram.com/p/CfS-_HvMhQ8/?utm_source=ig_web_button_share_sheet
फोटो शेअर करुन आलियानं त्याला, ‘आमचं बाळ लवकरच येत आहे’, असं कॅप्शन दिलं आहे. आलियानं शेअर केलेल्या फोटोला अनेकांनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
आलियानं शेअर केलेल्या फोटोला तिच्या चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन शुभेच्छा दिल्या आहेत. आलियानं शेअर केलेल्या फोटोला करण जोहर, मौनी रॉय, रकुलप्रीत सिंह, परिणिती चोप्रा, टायगर श्रॉफ आणि प्रियांका चोप्रा या सेलिब्रिटींनी कमेंट्स करुन रणबीर आणि आलियाला शुभेच्छा दिल्या आहेत.