जामनेर तालुक्यातून 28 वर्षीय विवाहिता बेपत्ता

0

जामनेर ;- तालुक्यातील एका गावातून येथून एक 28 वर्षीय विवाहित तरुणी घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याची घटना १२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडले असून याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की , तालुक्यातील एका गावातील रहिवासी असलेल्या 28 वर्षीय विवाहित तरुणी ही घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेल्याचा प्रकार 12 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडला. नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेतला असता ती मिळून न आल्याने अखेर 14 रोजी जामनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल साहिल तडवी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.