लासूर शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत सुरळीत मतदान सुरू

0

लासूर ता.चोपडा, लोकशाही न्युज नेटवर्क 

येथील किसान शिक्षण विद्या प्रसारक मंडळ संचलित महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयाच्या २०२३ ते २०२८ कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणुकीकरिता मतदान सुरू असून दुपारी ३ वाजेपर्यंत जवळपास ९५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.निवडणुकीत लोकमान्य पॅनल विरूध्द नम्रता पॅनल अशी सरळ लढत असतांनाच चार अपक्षांनी देखील रिंगणात उडी घेतल्याने मतदानात चुरस वाढली आहे.

संस्थेत एकूण १ हजार ८० एवढे सदस्यांचे संख्याबळ आहे.आजच मतदानाच्या दिवशी सायंकाळी मतमोजणी पार पडणार आहे.लासूर परिसरातील सर्वात मोठी संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किसान शिक्षण विद्या प्रसारक मंडळाच्या निवडणुकीच्या निकालाबाबत परिसरातील ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे.

निवडणूक सुरळीत पार पाडण्याकामी निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील, सहाय्यक निवडणूक अधिकारी राजेंद्र महाजन, कर्मचारी रवींद्र म्हैसरे कामकाज पाहत असून शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील जितेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार बापू साळुंखे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल जाधव, पोलीस कॉन्स्टेबल मनीष गावित, पोलीस मित्र गोकुळ शिरसाठ यांनी बंदोबस्त राखला.

Leave A Reply

Your email address will not be published.