जामनेर शहरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता

0

जामनेर;-शहरातील वाकी रोडवरील एका परिसरात राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणी घरात कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना उघडके झाली असून या प्रकरणी तिच्या पित्याने फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की वाकी रोड परिसरात राहणाऱ्या एका शेतकऱ्याची 18 वर्षीय मुलगी 13 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा ते साडेतीन वाजे दरम्यान घरातून कुणालाही काही एक न सांगता निघून गेली. या प्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे .तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विनोद पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.