१५ वर्षीय एलवयीन मुलीला फूस लावून पळविले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

0

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

जामनेर (Jamner) मध्ये धक्कादायक बाब घडली आहे. १५ वर्षीय एलवयीन मुलीला फूस लावून पळविण्यात आले आहे. पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. जामनेर शहरातील भुसावळ रोडवरील स्वामी स्टेडियम दुकानाजवळ पंधरा वर्षे अल्पवयीन मुलगी हे आपल्या मैत्रिणी सोबत शुक्रवारी २७ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता लसी घेण्यासाठी दुकानावर आली असता, अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी कारण सांगून फसवले आणि अपहरण केले पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या जामनेर शहरातील बाजारात शोध लावला परंतु कुठेही तरुणी आढळली नाही. त्यामुळे जामनेर पोलीस ठाण्यात सायंकाळी सात वाजता धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अनिल वाटेकरीत आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.