४००ची थाळी पडली २लाखात, पुण्यात घडला धक्कादायक प्रकार

0

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑनलाईन जेवण मागवतांना जरा काळजी पूर्वकच मागवा. कारण पुण्यात (Pune) एक भयंकर प्रकार सामोर आला आहे. पुण्यात ‘एकावर एक फ्री’चं आमिष एका महिलेला चांगलंच भोवलं आहे. एकावर एक फ्री थाळी घेण्याच्या नादात महिलेला 400 रुपयांची थाळी 2 लाखांना पडली आहे. पुण्यातील एका नामांकित हॉटेलची ऑफर असल्याचे भासवत बँकेतून रक्कम गायब केली. केरळमधील सायबर चोरट्यांनी (Cyber thieves) पुण्यातील महिलेची 2 लाख रुपयांची फसवणूक केली. यानंतर महिलेने स्थानिक पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

जाहिरात पाहून मागवले जेवण
फेसबुक वर जाहिरातीच्या माध्यमातून महिलेने जेवण मागवले. फेसबुकवर या नामांकित हॉटेलची एका थाळीवर एक थाळी फ्री देणार अशी एक जाहिरात होती. या महिलेने ही जाहिरात पहिली होती. त्या जाहिरातीवर फोन नंबर देण्यात आला होता. त्या नंबरवर त्यांनी संपर्क केला असता केरळमध्ये असलेल्या या सायबर चोरट्यांनी ऑर्डर करण्यासाठीचे आणि पेमेंट करण्यासाठी लागणारे सर्व डिटेल्स मागितले. यावेळी महिलेने तिच्याकडील क्रेडिट कार्डची माहिती देताच, काही वेळात त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 2 लाख रुपये गायब झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.