पारोळ्यात विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पारोळा (Parola) येथे आज दुपारी ३,४० पासून विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पावसाला (Unseasonal rain) सुरुवात झाली असून, या पावसाने अनेकांची तेद्रा उडाली आहे. या पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. लग्नसराई मुळे बाजारपेठेत आलोट गर्दी होती परंतु अचानक वातावरणात बदल झाल्याने अनेक ग्राहकांनी नागरीकांनी बाजारातुन काढता पाय घेतला तर काहींनी सांगितले की पावसाळ्यात ही एवढा विजांच्या कडकडाटात व ढगांच्या गडगडाट पाहायला मिळाला नाही. तेवढा विजांच्या कडकडाट व ढगांच्या गडगडाट या अवकाळी पावसात पाहायला मिळाला असल्याची माहिती जाणंकारीनी दिली. पावसाच्या आगोदर जोरदार वादळ आल्याने अनेकांची घाबरगुंडी उडाली होती नंतर मात्र जोरदार पावसाला सुरूवात झाली या पावसाने शहरात गारवा निर्माण झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.