पहूर बस स्थानकाची दयनीय अवस्था, साथीच्या आजाराची शक्यता

0

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पहूर (Pahur) ता.जामनेर गेल्या तीन दिवसापासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) सर्वत्र कहर केला असून यातच पहूर बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. पहूर बस स्थानकात पूर्णपणे पाणी साचले असून प्रवाशांना जाण्या-येण्यासोबत बसण्यासही जागा राहिलेली नाही. जळगाव-संभाजीनगर महामार्गावर असलेल्या चौफुली वरील पहूर बस स्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून गेल्या तीन दिवसापासून सर्वत्र गारपिट सह अवकाळी पावसाने कहर केला आहे. या पावसाच्या तडाख्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच तसेच सर्वत्र महामार्गावरील रस्त्याचे कामे युद्ध पातळीवर सुरू असून याचाच एक भाग म्हणून बस स्थानक परिसरात रस्त्याच्या कामास गती आली असली तरी पहूर बस स्थानक समोर रस्त्याच्या लेव्हलनुसार बस स्थानक आल्यामुळे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा मुळे पहूर बस स्थानकात प्रचंड पाणी साचले असून बस स्थानकाला डबक्याचे स्वरूप आले आहे. तर पास धारक विद्यार्थ्यांचेही पास काढण्यासाठी या ठिकाणी हाल होत आहे. रस्त्याच्या कामासोबतच लवकरात लवकर पहूर बस स्थानकाचाही प्रश्न मिटवा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत असून बस स्थानकात साचलेल्या डब्यामुळे साथीचे आजार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी लवकरात लवकर बस स्थानकाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.