कृषी उत्पन्न बाजार समितीत बोगस मतदान होत आहे; अपक्ष उमेदवार देवेन सोनवणे

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

जळगाव (Jalgaon) कृषी बाजार उत्पन्न समितीसाठी आज शुक्रवार रोजी मतदान होणार आहे. यासाठी जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात (Nutan Maratha College) हे मतदान पार पडणार आहे. या दरम्यान शिंदे गटाकडून बोगस मतदान करण्यात आल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला. यामुळे काही काळ मतदान केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता.

कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल-मापाडी मतदार संघात बोगस मतदान होत असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार, देवेन सोनवणे व धुडकू सपकाळे यांनी केला. यामुळे सकाळी १० वाजेच्या सुमारास मतदान केंद्रावर काही काळ गोंधळ उडाला होता. उमेदवारांनी थेट मतदान केंद्रात जावून राडा घातला. तसेच मतदान प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी या वादात मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवळला.

Leave A Reply

Your email address will not be published.