धक्कादायक खुलासा.. तोएबाचा दहशतवादी BJPचा आयटी सेलप्रमुख

0

जम्मू काश्मीर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा धक्कादायक खुलासा उघडकीस आलाय. जम्मू-कश्मीरमध्ये रविवारी अटक करण्यात आलेला लश्कर-ए-तोएबाचा वॉण्टेड दहशतवादी भाजपचा सक्रिय पदाधिकारी होता. तो जम्मूतील भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या आयटी सेलचा प्रमुख म्हणून कार्यरत होता, असा धक्कादायक खुलासा अटकेच्या कारवाईनंतर झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. यावर भाजपने ऑनलाइन सदस्य नोंदणीला जबाबदार धरले आहे.

अमरनाथ यात्रेला येणाऱ्या  भाविकांना टार्गेट करून हल्ल्याचा कट रचल्याच्या आरोपाखाली सुरक्षा दलांनी तालिब हुसैन शाह व त्याच्या साथीदाराला रविवारी सकाळी अटक केली. या दोघांना जम्मूच्या रियासी भागात गावकऱ्यांना पकडले. दोघांकडून दोन एके रायफल, अनेक ग्रेनेड्स आणि इतर शस्त्र व दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. गावकऱ्यांनी त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर अटक करण्यात आली. यापैकी तालिन शाह हा लश्कर-ए-तोयबाचा एक वॉण्टेड दहशतवादी होता. तो याआधी भाजपचा सक्रिय सदस्य होता. त्याच्याकडे जम्मूतील भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या सोशल मीडियाची प्रमुख जबाबदारी सोपवली गेली होती. अटकेच्या कारवाईनंतर त्याची भाजपमधील सक्रियता उघड होताच सुरक्षा यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत.

लश्कर-ए-तोएबाच्या दहशतवाद्याचे भाजपशी असलेले जुने संबंध उघडकीस येताच प्रचंड खळबळ उडाली आहे. यावर भाजपचे प्रवक्ते आर. एस. पठानिया यांनी स्पष्टीकरण दिले आहे. भाजपकडून ऑनलाइन सदस्य नोंदणीमध्ये नव्या सदस्यांची आधीची पार्श्वभूमी न तपासताच पक्षात प्रवेश देत आहे. अशा प्रकारे सदस्य बनून पक्षाच्या नेत्यांना मारण्याचा कट रचला जाऊ शकतो, असे पठानिया यांनी म्हटले आहे.

निरपराध्यांचे हत्याकांड करणाऱ्या दहशतवाद्यांचे जीवनही अल्पायुषी ठरत असून दहशतवादी संघटनांमध्ये दाखल होणाऱ्या तरुणांपैकी 64 टक्के दहशतवाद्यांचा खात्मा हा एका वर्षाच्या आत झाला आहे, अशी माहिती केंद्रीय गृह विभागातील सूत्रांनी दिली. दरम्यान, कश्मीर खोऱयातील दक्षिण भागात अजूनही दहशतवादी कारवायांचा जोर कायम असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

जम्मू-कश्मीरमध्ये खबऱ्यांच्या  मजबूत नेटवर्कच्या जोरावर लष्कराकडून राबवण्यात आलेल्या दहशतवाद्यांविरोधातील मोहिमा यशस्वी झाल्या असून त्याची आकडेवारी देण्यात आली आहे. यात 1 जानेवारी ते 31 मे 2022 पर्यंत राबवण्यात आलेल्या मोहिमांत दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झालेल्या 64.1 टक्के दहशतवाद्यांचा खात्मा झाला तर उर्वरित 26.6 टक्के दहशतवाद्यांचा खात्मा हा एक वर्षानंतर करण्यात लष्कराला यश आले.

मात्र, उर्वरित 9.3 टक्के दहशतवाद्यांचे काय झाले, याची माहिती मिळू शकलेली नाही. दहशतवादी संघटनांमध्ये नव्याने दाखल होणाऱया 28.1 टक्के दहशतवाद्यांचा खात्मा हा एका महिन्याच्या आत, 54.7 जणांचा खात्मा हा 6 महिन्यांच्या आत तर 59.4 टक्के दहशतवाद्यांचा खात्मा हा 9 महिन्यांच्या आत केला असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली. सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दक्षिण कश्मीरमध्ये गेल्या पाच महिन्यांत 59 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर मध्य आणि उत्तर कश्मीरमध्ये 31 जणांचा खात्मा करण्यात आला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.