महिलेच्या घरावर दगडफेक करत धमकी; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तांबापूरा येथील नाथवाडा परिसरात काहीही कारण नसतांना घरावर दगडफेक केल्याचा जाब विचारणाऱ्या महिलेला शिवीगाळ करून धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हमीदाबी शेख तस्लिम (वय ४५, रा. दत्त मंदीराजवळ, नाथवाडा, तांबापूरा) या महिला आपल्या कुटुंबियांसह राहतात. रविवारी ३ जुलै रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास पिन्या (पुर्ण नाव माहित नाही) यांच्यासह अनोखळी एक यांनी हमीदाबी या घरात झोपलेले असतांना घरावर दगडफेक केली. हमीदाबी व तिचे मुले बाहेर येवून पाहिले असता पिन्यासह अनोळखी एकजण दिसून आला. त्यांनी दगडफेक का करता असा जाब विचारल्याने तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या अशी धमकी दिली व पसार झाले.

रविवारी ३ जुलै रोजी दुपारी महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.