वयोवृध्दाची गळफास घेत आत्महत्या

0

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील ७३ वर्षीय वयोवृध्दाने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घटना उघडकीस आहे. संतोष माधवराव कोळी (वय ७३, रा. उत्राण ता. एरंडोल) असे मृत वयोवृध्दाचे नाव आहे. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संतोष कोळी हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. रविवारी ३ जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या पुर्वी राहत्या घरातील लोखंडी अँगलला नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घडली आहे. दरम्यान कुटुंबियांच्या लक्षात आल्याने त्यांनी संतोष कोळी यांना तातडीने एरंडोल ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.