Saturday, January 28, 2023

भीषण अपघात.. बस दरीत कोसळली, शाळकरी मुलांसह 16 जणांचा मृत्यू

- Advertisement -

हिमाचल प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क

हिमाचलल प्रदेशच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात झाला आहे. कुल्लूमध्ये शैनशारहून सैंजच्या दिशेनं येणारी खासगी बस जंगला गावाजवळ रस्त्यावरून घसरली, त्यामुळे हा भीषण अपघात घडला. या अपघातात 16 लोकांचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये काही शाळकरी मुलांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, बसमधून 15 ते 16 जण प्रवास करत होते. सकाळी साडेआठच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातस्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेबाबत अद्याप सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून काही स्थानिकांच्या मदतीनं बचावकार्य तात्काळ सुरु करण्यात आलं आहे.

कुल्लू जिल्ह्यातील शैनशारमध्ये एका खाजगी बसचा अपघात झाला. बस जंगला गावापासून जवळपास 200 मीटर अंतरावर रस्त्यावरुन दरीत कोसळली. दुर्घटनेत 16 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच, या प्रवाशांमध्ये शाळकरी मुलांचाही समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. बचाव कार्य सुरु असून तीन जणांना बाहेर काढण्यात आलं असून ते गंभीर जखमी असल्याचंही सांगितलं जात आहे. जखमींमध्ये बसच्या चालकाशिवाय प्रवाशांचा समावेश आहे. शाळकरी मुलं शाळेतून घरी परत होती, त्यावेळी हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

बस रस्त्यावरुन तब्बल 200 मीटरपर्यंत खोल दरीत कोसळली. ही दुर्घटना सोमवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी घडली. बस शैनशारहून औटच्या दिशेनं जात होती. कुल्लूचे उपायुक्त आशुतोष गर्ग यांनी सांगितलं की, बस अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे