आ. मंगेश चव्हाणांसाठी दूध संघाचे मोठे आव्हान

0

लोकशाही संपादकीय लेख

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर गेल्या सात वर्षापासून सत्ता असलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याकडून शिंदे फडणवीस गटातर्फे विशेषतः पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या शेतकरी विकास पॅनलने सत्ता काबीज केली. दूध संघावर विजय मिळवण्यात जेवढा वाटा दोन्ही मंत्र्यांचा आहे., तेवढाच वाटा आ. मंगेश चव्हाण यांचा देखील आहे.. एकनाथ खडसेंना आव्हान देऊन त्यांच्याशी खऱ्या अर्थाने दोन हात करण्यात आ. मंगेश चव्हाण यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचीच बक्षीस म्हणून मंगेश चव्हाण यांवर दूध संघाच्या चेअरमन पदाची बिनविरोध धुरा सोपवण्यात आली. दूध संघ डबघाईस आल्यानंतर एमडीडीबीच्या ताब्यात देऊन प्रशासन प्रशासक नेमण्यात आला होता. गेल्या सात वर्षांपूर्वी एनडीडीबी सोबत दूध संघातील प्रशासक उठवून निवडून निवडणूक घेण्यात आली. त्या निवडणुकीत माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात सर्वपक्षीय पॅनल विजय झाले. सौ मंदाकिनी खडसे चेअरमन झाल्या. गेल्या सात वर्षात संघ नफ्यात आला. शंभर कोटींची विकासात्मक गुंतवणूक झाली.

खडसे म्हणतात सात वर्षाच्या कालावधी दूध संघ प्रगतीपथावर आणला. दरम्यान रीतसर संघाची निवडणूक घेण्याऐवजी शिंदे फडणवीस सरकारने संघावर प्रशासक मंडळ नियुक्त करून संघात गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती नियुक्त केली. प्रशासक मंडळाचे प्रमुख आ. मंगेश चव्हाण हेच होते. त्यांना 40 दिवसाचा कालावधी मिळाला परंतु न्यायालयाने प्रशासक मंडळ नियुक्ती दिली. परंतु या 40 दिवसाच्या कालावधीत प्रशासक असलेले मंगेश चव्हाण यांनी दूध संघातील अनेक गैरव्यवहारांची प्रकरणे उघडकीस आणली, गुन्हे दाखल केले. संघाचे कार्यकारी संचालक यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली. संघातील काही अधिकारी व कर्मचारीही अटकेत होते. दरम्यान दूध संघाची शासनाने निवडणूक घोषित केली. एकनाथ खडसेंच्या ताब्यातून दुध संघ निवडणुकीच्या माध्यमातून ताब्यात घेतला गेला. खुद्द खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघातून आ. मंगेश चव्हाण यांनी मंदाकिनी खडसेंच्या विरोधात निवडणूक लढवून त्यांना धूळ चारली. निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक प्रचार काळात आ. मंगेश चव्हाण यांना एकमेव कार्यक्रम होता, तो म्हणजे ‘एकनाथ खडसेंवर हल्लाबोल करणे’..! त्यामुळे निवडणूक निकालाद्वारे संघातील खडसे पर्वाचा अस्त झाला. या संपूर्ण निवडणुकीत प्रचारादरम्यान हिरो ठरले ते म्हणजे आ. मंगेश चव्हाण..

आ. मंगेश चव्हाण चाळीसगावचे भाजपचे तरुण तडफदार आ. म्हणून अगदी कमी कालावधीत नावलौकिक प्राप्त केलेले आमदार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे सच्चे समर्थक म्हणून ते ओळखले जातात. महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या विजेच्या बिलावरून मंगेश चव्हाण यांनी वीज वितरण कार्यालयात जाऊन आंदोलन केले. वीज वितरण अभियंत्याला खुर्चीवर बांधून ठेवले. त्याबद्दल त्यांना अटक झाली. आठ-दहा दिवस जेलमध्ये राहावे लागले. ‘शेतकऱ्यांच्या हितासाठी पुन्हा जेलमध्ये जावे लागले तर जायला तयार आहे’.. असे म्हणणाऱ्या आ. मंगेश चव्हाण यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. आता शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच जिल्हा दूध संघातील गैरव्यवहारावर लक्ष केले. आ. महेश चव्हाण एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने शेतकऱ्यांच्या व्यथांची त्यांना जाणीव आहे. जिल्हा दूध संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बदलण्याचा त्यांचा मानस आहे.

जिल्ह्यातील दूध संघातील सभासद असलेल्या एकूण ४४७ दूध विकास सोसायट्यांची संख्या वाढवण्याचा त्यांचा विचार आहे. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ १९७५ साली दुधाच्या महापूर योजनेअंतर्गत सहकार तत्त्वावर स्थापन झाला. त्याचा मूळ गाभा चुकीच्या व्यवस्थापनामुळे हरवला गेला. संघाला लोकनियुक्त संचालकांनी लुबाडून खाल्ले. संघ डबघाईस गेला. त्याचे उत्पादन बंद पडल्याने संघ एनडीडीबीच्या ताब्यात दिला गेला. त्यामुळे जिल्हा दूध संघाची राज्यातही छी-थू झाली. दूध उत्पादक शेतकरी हतबल झाला. एनडीडीबीच्या व्यवस्थापनामुळे दूध संघाचे गणित सुधारले. तेव्हा सात वर्षांपूर्वी निवडणुकीच्या माध्यमातून खडसे यांच्या नेतृत्वात संघावर लोकनियुक्त संचालक मंडळाचा कारभार सुरू झाला. दूध संघाला खडसे गटाने लुबाडले, संघात फार मोठा गैरव्यवहार झाला, शेतकरी आहे तसाच राहिला, असे आरोप खडसे गटावर आ. मंगेश चव्हाण यांनी करून सत्तेचा वापर करून गुन्हेही दाखल केले.

राजकारणाच्या स्पर्धेत संघाच्या गैरव्यवहारा संदर्भात एकनाथ खडसेंवर आ. चव्हाण यांच्याकडून आरोप केले असले, तरी केल्या सात वर्षात दूध संघ नफ्यात आहे. संघातील विविध विकास प्रकल्पावर 100 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे राजकारण म्हणून खडसेंवर आरोप करून दूध संघाचा ताबा घेतला असला, तरी आता स्वतः चेअरमन म्हणून आ. मंगेश चव्हाणांवर फार मोठी जबाबदारी आहे. चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘जळगाव जिल्हा दूध संघ राज्यात पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावरील आणण्यासाठी प्रयत्न केले जातील’, अशी घोषणा मंगेश चव्हाण यांनी केली. ही घोषणा चांगली असली, तरी त्यासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागणार आहे. एकनाथ खडसे हे अनुभवी असल्याने त्यांचे संघावर स्वतःचे वर्चस्व होते. त्यांच्या अनुभवाचा फायदा संघाला झाला, हे मान्य करावेच लागणार आहे. आता नवे चेअरमन म्हणून आ. मंगेश चव्हाण यांच्या समोर दूध संघाच्या विकासाचे पर्यायाने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्याचे साधण्याचे मोठे आव्हान आहे. हे आव्हान आ. चव्हाण कसे पेलतील यावर आगामी संघाच्या कारभाराचे यश अवलंबून आहे….!

Leave A Reply

Your email address will not be published.