‘अवतार 2’ चा डंका; दोन दिवसात बक्कळ कमाई

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या सर्वदूर ‘अवतार 2’ ची (Avatar 2) चर्चा सुरु आहे. हा सिनेमा प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा आहे. या सिनेमाने प्रेक्षकांचे मन जिकंले या सिनेमाच्या निर्मितीसाठी तब्बल 2800 कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले आहेत. दोनच दिवसात बक्कळ कमाई केली आहे. ‘अवतार 2’ हा सिनेमा 13 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 16 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सध्या भारतीय बॉक्स ऑफिससोबतच ‘अवतार 2’ (Avatar 2) हा सिनेमा जगभरात धुमाकूळ सुरु आहे.

रिलीजनंतर अवघ्या दोनच दिवसात भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 80 कोटींची कमाई करणारा ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way of Water) हा सिनेमा जागतिक स्तरावरही हा सिनेमा चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमाने जगभरात आतापर्यंत 1500 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. यासोबतच भारतातही या सिनेमाने सर्व भाषांमध्ये एकूण 100 कोटींची कमाई केली आहे.

भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘अवतार 2’ या सिनेमाने रिलीजनंतर आपली छाप सोडली आहे. पहिल्याच दिवशी ‘अवतार 2’ने 41 कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच, दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवारी या सिनेमाने 42 ते 43 कोटी रुपयांची कमाई केली.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.