महसूल व शिक्षण विभाग वरणगावकर विद्यालयाच्या दावणीला?

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील घाटपुरी येथील सरलाताई वरणगावकर विद्यालय व्यवस्थापनाने ग्रा. पं. च्या ओपन स्पेसवर अतिक्रमण केले आहे. तर शाळेला पुरेसे खेळाचे मैदान नाही. यासंदर्भात स्थानिक नागरिकांची ओरड होत असतांंना व वृत्त मालिका प्रसिद्ध होत असतांना सुद्धा महसूल व शिक्षण विभागयाकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करुन कारवाई करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता नागरिक न्यायालयात दाद मागण्याच्या पावित्र्यात असल्याचे बोलले जात आहे.

सरलाताई वरणगावकर विद्यालयाने अंदाजे मागील 20 ते 22 वर्षापासून किसन नगर भागातील पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या शाळेसमोरील ग्रा. पं. च्या ओपन स्पेसवर व शिवदांड रस्त्यावर मालकी हक्काप्रमाणे अतिक्रमण केले आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारीवरुन लोकशाहीमध्ये वृत्त मालिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये कशाप्रकारे अतिक्रमण करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर नमूद करण्यात आले आहे. तरी सुध्दा झोपेचे सोंग घेतलेल्या प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत. सरलाताई वरणगावकर विद्यालयाने ओपन स्पेसवर कच्चे/पक्के बांधकाम करण्यासाठी कुठलीही परवानगी घेतली नाही तर जागा सुद्धा लिजवर घेतली नसल्याचे समजते. येथील शिक्षण विभागाचे अधिकारी खरात यांच्याशी संपर्क साधला असता सदर शाळा खाजगी असल्याचे सांगून उडवाउडवीचे उत्तरे देण्यात येत आहे. तर पं. स. गट शिक्षणाधिकारी यांची सुद्धा तीच गत आहे. वास्तविक पाहता सदर विद्यालय अनुदानित असल्याचे समजते. परंतु खाजगी आहे म्हणून सरकारी नियम लागू नाहीत काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

अकोला येथील मनपाच्या ओपन स्पेसवर उभारलेले डि.आर. पाटील विद्यालय नुकतेच जमीनदोस्त करण्यात आले आहे. पण येथे महसूल प्रशासनात वरणगावकर विद्यालयाचा दबदबा असल्याने कोणताही अधिकारी कारवाई करण्यास धजावत नाही. त्यामुळे आता नागरिकांना न्यायालयात दाद मागण्याशिवाय पर्याय उरला नसल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.