सिंधी कॉलनीमध्ये महिलेचा विनयभंग; एकावर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जळगावातील सिंधी कॉलनी भागात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२६ वर्षीय महिला जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार ३० जुलै रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास रौनक रामकुमार कुकरेजा याने महिलेला फोन करून त्याच्या घरी काम असल्याचे सांगून घरी बोलावले. घरात कुणीही नसल्याचा फायदा घेत महिलेशी अंगलट करत हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला.

दरम्यान महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रात्री ११.३० वाजता संशयित आरोपी रौनक रामकुमार कुकरेजा याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ प्रदीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.