ISIS कनेक्शन.. कोल्हापूर, नांदेडमध्ये NIA चे छापे; दोघे ताब्यात

0

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशासह राज्यात देखील दहशतवादी होत आहेत. आयसीस (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संबंधीत प्रकरणावर राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने (National Investigation Agency) देशभरात 6 ठिकाणी छापे टाकले आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) कोल्हापूरमध्येही (Kolhapur) छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईमध्ये दोन जणाला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आज सकाळपासून एनआयएने देशभरातील 6 राज्यांमध्ये छापेमारी केली.  कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी रेंदाळमध्ये NIA चा छापा पडल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमध्ये एनआयएने दोन जणांना ताब्यात घेतले असल्याचे समोर आले आहे. पहाटे 4 वाजता कारवाई करण्यात आली आहे. मात्र, नेमकं कुणी अटक केली याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.

एनआयएने 6 राज्यांमध्ये 13 संशयित ठिकाणी छापे टाकले आहे. या कारवाईमध्ये काही आपत्तीजनक कागदपत्र आणि सााहित्य हाती लागले आहे. एनआयएकडून आयसीस माड्यूल केस (ISIS Module Case) (RC-26/2022/NIA-DLI) प्रकरणाशी छापे टाकण्यात आले आहे.

एनआयएने ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे. मध्य प्रदेशमधील भोपाल आणि रायसेन जिल्ह्यात छापे टाकले आहे. तर गुजरातमधीर भड़ौच, सूरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्ह्यात कारवाई केली आहे. बिहारमधील अररिया, कर्नाटकमधील भटकल आणि तुमकुर जिल्ह्यात छापे टाकले आहे, तर महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि कोल्हापूरमध्ये छापे टाकले आहे. उत्तर प्रदेशमधील देवबंदमध्ये आयसीसशी संबंधित प्रकरणावर तपास सुरू आहे.

NIA ने दिनांक 25.06.2022 रोजी आयपीसी कलम 153 ए, 153 बी आणि UA (P) Act कलम 18, 18बी, 38, 39 आणि 40 नुसार गुन्हे दाखल केले आहे. NIA च्या या कारवाईमध्ये काही संशयास्पद कागदपत्र आणि साहित्य हाती लागले आहे. या वस्तुची तपासणी सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.