मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शिवसेना नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांची ९ तासांपासून चौकशी सुरु आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे.
हे देखील वाचा
मोठी बातमी.. संजय राऊतांच्या घरी ED चे पथक दाखल
ED चे अधिकारी वैतागले
1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत हे ईडी अधिकाऱ्यांना तपासात सहकार्य करत नाहीत, त्यामुळे ईडीचे अधिकारी वैतागल्याची माहिती मिळाली आहे.
#WATCH Shiv Sena leader Sanjay Raut at his Mumbai residence as Enforcement Directorate conducts a raid there, in connection with the Patra Chawl land scam case pic.twitter.com/TnemlfgV1F
— ANI (@ANI) July 31, 2022
राऊतांना अटकेची शक्यता – उद्धव ठाकरे
संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता असल्याचं स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
पत्राचाळ घोटाळा काय आहे ?
627 मराठी कुटूंबीय राहत असलेली पत्राचाळची जागा विकसित करण्यासाठी म्हाडाकडून संजय राऊतांचे नातेवाईक प्रवीण राऊत यांना देण्यात आली. यासाठी संजय राऊतांनी दबाव वापरल्याचा आरोप आहे. राऊतांनी 3000 मराठी कुटूंबियांसाठी घरे न बांधता 4,355 कोटींच्या पीएमसी बँक घोटाळ्याचे आरोपी वाधवानसह इतर बिल्डरांना परस्पर ही जागा 1034 कोटींना विकल्याचा आरोप आहे. 627 मराठी कुटुंबीय अजूनही बेघर आहेत.