चक्क.. युट्यूबवर व्हिडिओ पाहून मुलाने बनवली वाईन

0

केरळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

युट्यूबवर सध्या लोकं अनेक नवनवीन गोष्टी शिकतात. मात्र काही वेळेस नको त्या गोष्टी शिकल्याने अडचणी निर्माण होतात. अशीच एक घटना उघडकीस आली आहे. केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये 12 वर्षांचा मुलगा युट्यूब व्हिडिओ पाहून स्वत: द्राक्ष वाइन बनवून अडचणीत आला आहे. वाइन प्यायल्यावर, त्याच्या मित्राला नंतर अस्वस्थता आणि उलट्या झाल्या आणि त्याला जवळच्या चिरायंकीझू येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

वाइन प्यायलेल्या मुलाची आणि त्याच्या एका वर्गमित्राची प्रकृती स्थिर असून त्याला नंतर रुग्णालयातून सोडण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी तिरुवनंतपुरममधील एका सरकारी शाळेत ही घटना घडली आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवला, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

“चौकशीदरम्यान, मुलाने कबूल केले की, त्याने आई-वडिलांनी विकत घेतलेल्या द्राक्षांचा वापर करून वाईन बनवली होती. त्याने स्पिरिट किंवा इतर कोणत्याही अल्कोहोलचा वापर केला नाही. वाइन तयार केल्यानंतर, त्याने ती एका बाटलीत भरली आणि पुरली.”

या मुलाने शाळेत आणलेल्या बाटलीतील वाईनचे नमुने पोलिसांनी घेतले असून, येथील स्थानिक न्यायालयाच्या परवानगीने ते रासायनिक तपासणीसाठी पाठवले आहे. “वाईनमध्ये स्पिरीट किंवा इतर अल्कोहोल मिसळले होते का, हे स्पष्ट करायचे आहे, असे काही असल्याचे आढळल्यास, आम्हाला बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवावा लागेल,” असेही अधिकाऱ्यांनी मुलांच्या पालकांना सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.