अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडल्याने विवाहिता गंभीर

0

जळगाव : अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरुन पडून नसरीन वसीम पिंजारी (वय २८, रा. रा. सत्यम पार्क) विवाहिता गंभीर जखमी झाल्या. ही घटना शनिवारी ९ मार्च रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. वाजेच्या सुमारास दूध फेडरेशनजवळील समृद्धी अपार्टमेंट परिसरात घडली. विवाहितेची प्रकृती चिंताजनक असून सासरच्यांकडून विवाहितेसोबत घातपात केल्याचा संशय माहेरच्यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री १० वाजता पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदूरबाद जिल्ह्यातील रणाळे येथील माहेर असलेल्या नसरीन पिंजारी यांचा विवाहिता शहरातील सत्यम पार्क परिसरातील समृद्धी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या वसीम पिंजारी यांच्यासोबत झाला आहे. त्या सासू, सासरे, दीर, दिराणी यांच्यासह याठिकाणी वास्तव्यास आहे. त्याच अपार्टमेंटखाली त्यांचे पतीचे दुचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यामध्ये कौटुंबिक वाद सुरु होते. विवाहितेच्या माहेरच्या नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर लागलीच जळगाव येथे दाखल झाले. दरम्यान, तिला होत असलेल्या मारहाण आणि छळ संदर्भात शहर पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार रात्री ९ वाजता पती वसीम छोटू पिंजारी, सासरा छोटू उमर पिंजारी, सासू हसीना छोटू पिंजारी, ननंद किरिष्मा अकिल पिंजारी सर्व रा. समृध्दी अपार्टमेट, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल हे करीत आहे. या प्रकरणात पतीसह इतर दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.