घरच्या घरी बनवा स्ट्रॉबेरी साॅस

0

खाद्यसंस्कृती विशेष

लालचटक स्ट्रॉबेरी पाहिली सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. स्ट्रॉबेरी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यातमध्ये आपल्या आहारात स्ट्रॉबेरीचा जरूर समावेश करावी त्यात अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करण्याची ताकद आहे. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. यात पॉलिफेनोल्स नावाचे अँटी-ऑक्सिडेंट देखील मोठ्या प्रमाणात असतात. चला तर मग दीर्घकाळ टिकणारा स्ट्रॉबेरी साॅस घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहूया..

साहित्य 

१/२ किलो स्ट्रॉबेरी

१/२ कप पांढरी दाणेदार साखर

१ टीस्पून व्हॅनिला इसेन्स

१ टीस्पून ताजे लिंबाचा रस

कृती

१. स्ट्रॉबेरी बारीक चिरून एका पातेल्यात मंद आचेवर शिजवण्यासाठी ठेवा.

२. साखर, व्हॅनिला आणि लिंबाचा रस घालून चांगले ढवळत रहा.

३. झाकण ठेवून १५ मिनिटे शिजवा, अधूनमधून ढवळत राहा.

४. स्ट्रॉबेरी मिश्रण प्युरी करण्यासाठी ब्लेंडर मधून एकदाच फिरवून घ्या.

५. पुन्हा एकदा पातेल्यात मिश्रण घालून ते जॅम इतकं दाटसर होईपर्यंत शिजवून घ्यावे.

६. थंड झाल्यावर काचेच्या बरणीत भरून ठेवावे.

चपाती सोबत जॅम सारखे खाऊ शकतात किंवा मुलांच्या डब्यात देऊ शकता. घरी बनविलेल्या पदार्थांची चव आणि आनंद वेगळाच असतो.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे-नांगरे

पत्रकार/फुड ब्लॉगर, मुंबई

मो. ९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.