नागपूर ते संभाजीनगर 4 तर पुणे अवघ्या 2 तासात अंतर गाठता येणार

0

मुंबई ;- नागपूर ते संभाजीनगर हा २३० किलोमीटर लांबीचा होऊ घातलेला 6 पदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे पाहिला तर यामुळे नागपूर ते संभाजीनगर हे अंतर चार तासात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. तर संभाजीनगर वरून पुणे अवघ्या दोन तासात गाठता येणार आहे.

राज्यामध्ये पुणे- अहमदनगर- संभाजीनगर असा 230 किलोमीटर लांबीचा सहा पदरी नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग तयार होणार असून याकरिता केंद्राच्या रस्ते परिवहन व महामार्ग विभाग व महाराष्ट्र सरकारचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला असून या महामार्गामुळे पुणे शहराची समृद्धी महामार्गासोबत कनेक्टिव्हिटी निर्माण होण्यास मदत होणार आहे.

इतकेच नाही तर या ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे मुळे नागपूर ते संभाजीनगर हे अंतर चार तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे तर संभाजीनगर वरून पुणे फक्त दोन तासात गाठता येणार आहे. एकूण 230 किलोमीटर लांबीचा हा 6 पदरी ग्रीनफिल्ड एक्सप्रेस वे असणारा असून या तीनही जिल्ह्यांच्या विकासासाठी हा ग्रीन फील्ड एक्सप्रेस वे येणाऱ्या काळात महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे.

संभाजीनगर पासून पुणे पर्यंतचा प्रवास पाहिला तर नगर मार्गे प्रवास करताना या रस्त्यावर प्रचंड प्रमाणामध्ये वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येते.

तसेच हा नवीन महामार्ग तयार झाल्यानंतर पुणे शहराला थेट समृद्धी महामार्गाची कनेक्ट करता येणार आहे. त्यामुळे पुणे, नागपूर तसेच मुंबई या महत्त्वाच्या शहरांची कनेक्टिव्हिटी देखील तयार होणार आहे.

पुणे-अहमदनगर-संभाजीनगर या महामार्गावर सहा ठिकाणी टोल असणार असून त्यामुळे उत्पन्न चांगले मिळेल व साधारणपणे शंभर कोटी रुपये दर महिन्याला या माध्यमातून उत्पन्न मिळेल. हा रस्ता तयार करण्याकरिता कर्ज काढून जास्तीचे भांडवल उभे करता येईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.