दारूसाठी पैसे दिले नाही ; कानात मारली बाटली

0

जळगाव;- दारूसाठी पैसे दिले नाही या रागातून एका तरुणाला शिवीगाळ करत काचेची बाटलीने उजव्या कानावर मारून दुखापत केल्याची घटना शहरातील सिंधी कॉलनी येथे घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख वाजिद शेख आयुब (वय-२७, रा. तांबापुरा, जळगाव) हा तरुण बुधवार २८ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता सिंधी कॉलनीतील भाजीपाला मार्केटजवळील गेटजवळ उभा होता. त्यावेळी त्याचा ओळखीचा सोनू सलीम कुरेशी रा.तांबापुरा, जळगाव हा त्या ठिकाणी आला. त्यावेळी सोनू याने शेख वाजिद त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. शेख वाजिदने पैसे नसल्याचे सांगितले. याचा राग आल्याने संशयित आरोपी सोनू कुरेशी याने शिवीगाळ करत हातात असलेली काचेची बाटली शेख वाजिदच्या उजव्या कानावर मारली. त्यामुळे त्यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली.

ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या तरुणाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी २९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता संशयित आरोपी सोनू सलीम कुरेशी याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.