क्रूरता : गाझामध्ये अन्नासाठी रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांवर इस्रायलने केलेल्या गोळीबारात १०४ जण मृत्युमुखी

0

नवी दिल्ली ;- गाझामध्ये इस्रायली लष्कराचा क्रूरपणा थांबायचं नाव घेत नाहीये. हमासच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, गाझा शहरातील मृतांची संख्या 30 हजारांच्या पुढे गेली आहे. गाझामधील निरपराध लोकांवरील इस्रायली सैन्याची क्रूरता कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी गुरुवारी केला.

ताज्या प्रकरणात लोक शहरात अन्नासाठी रांगेत उभे होते, मदत घेऊन येणाऱ्या ट्रकची वाट पाहत होते. यादरम्यान इस्रायली सैन्याने त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात 104 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

दरम्यान, गाझामधील पॅलेस्टिनींवर झालेल्या ताज्या हल्ल्याबाबत इस्रायली लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, त्या ठिकाणी गोळीबार झाल्याची कोणतीही माहिती नाही. उत्तर गाझामध्ये मदतीचा ट्रक आल्यावर चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे डझनभर लोक जखमी झाले. तथापि, एका इस्रायली सूत्राने सांगितले की, सैनिकांनी गर्दीतील त्या लोकांना निशाणा बनवले, ज्यांच्यापासून त्यांना धोका होता.

Leave A Reply

Your email address will not be published.