कारचे ऑईल खाली पडत असल्याचे सांगून दीड लाखांची रोकड लांबविली

0

जळगाव ;- कारचे ऑईल खाली पडत असल्याचे सांगून कारमधून १ लाख ५० हजारांची रोकड ठेवलेली पिशवी अज्ञात दोन जणांनी चोरून नेल्याची घटना शहरातील महात्मा गांधी रोडवर गुरूवार २९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोपाल काशिनाथ पलोड वय ६७ रा. हरेश्वर नगर, जळगाव याचे दाणाबाजार परिसरात दुकान असून ते गुरूवारी २९ फेब्रुवारी सायंकाळी ७ वाजता दुकान बंद करून कारने घरी जाण्यासाठी निघाले. दरम्यान, महात्मा गांधी रोडवरून जात असतांना एका दुचाकीवरून आलेल्या दोन जण अचानक समोर आले.

दोघांनी गोपाल पलोड यांना कारमधून ऑईल पडत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांचे व चालकाचे लक्ष विचलित करून कार मध्ये ठेवलेली १ लाख ५० हजार रूपयांची रोकडची बॅग दोघांनी लांबविली. काही कळण्याच्या आत दोघे भामटे दुचाकी वरून पसार झाले. ही घटना घडल्यानंतर गोपाल पलोड यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.