लोकशाही न्यूज नेटवर्क
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात पाऊस सुरु झाला आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये गुलाबी थंडी जाणवू लागलीच होती की, शनिवारी मध्य रात्रीपासून पाऊस सुरु झाला आहे. हवामान विभागाने 25 ते 26 नोव्हेंबर दरम्यान या तीन दिवस अवकाळी पावसाचा अंदाज यापूर्वीच व्यक्त केला होता. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार आहे.
मुंबईत मध्यरात्रीपासून पाऊस
मुंबई आणि मुंबई उपनगरात मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. वसई, विरार, नालासोपारा परिसरात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. मेघागर्जनेसह पावसाने हजेरी लावली आहे. या भागांत पाऊस सुरु होताच वीज पुरवठा खंडित झाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उन्हाच्या तीव्रतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
राज्यात अनेक जिल्ह्यांत यलो अलर्ट
पुणे हवामान विभागाने रविवारी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील अनेक भागांत पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. त्यानुसार पावसाळा सुरुवात झाली आहे. अजून दोन दिवस राज्यातील काही भागांत पावसाचं येलो अलर्ट असणार आहे. हिवाळी मोसमी वारे व चक्रीय वारे सक्रिय झाल्यामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे महाराष्ट्रात पाऊस पडत आहे. मोसमी वारे महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टीकडे आगेकूच करणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार,जिल्ह्यात रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.