१४ वर्षीय अल्पवयीन मुलीस जळगाव येथील फूस लावून पळविले

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी घडली होती. दरम्यान, मुलीचा शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्यास आहे. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी साठेआड वाजता ही मुलगी दुकानावर दूध घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.