भारताचा शत्रू अक्रम गाझीचा खात्मा, गोळ्या घालून केले ठार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताचा आणखी एका शत्रूचा पाकिस्तानात खात्मा झाला आहे. लष्कर-ए-तोयबाचा माजी कमांडर अक्रम खान उर्फ अक्रम गाझी याची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. अक्रम भारताविरुद्ध सातत्याने भकवणारे भाषण द्यायचा. अक्रम खान याने २०१८ ते २०२० या काळात लष्करती; भरतीचे काम पहिले होते. अशातच अक्रमची पाकिस्तानात हत्या करण्यात आली आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानात भारताविरोधात कारवाया करणाऱ्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ही घटना ९ नोव्हेंबर रोजी घडली होती.

लष्कर-ए-तोयबाचा माजी नेता अक्रम खान यांची गुरुवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पाकिस्तानातील बजौरमधे अक्रम खान उर्फ अक्रम गाझी याची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. दहशतवादी अक्रम गाझी याने २०१८ ते २०२० या काळात लष्कर भरती कक्षाचे नेतृत्व केले. तसेच ते पाकिस्तानमध्ये भारतविरोधी भाषणांसाठी ओळखला जात होते. अक्रम हा लष्कराच्या प्रमुख कमांडरांपैकी एक आहे. तो बराच काळ दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता.

Leave A Reply

Your email address will not be published.