जळगाव शहरातून प्रौढ बेपत्ता

0

जळगाव ;- शहरातील मोहाडी रोडवरील इंपिरियल हौसिंग सोसायटी येथील रहिवाशी एक ५५ वर्षीय प्रौढ व्यक्ती जळगावच्या न्यायालय परिसरातून काही न सांगता निघून गेल्याने जळगाव शहर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

मोहाडी रोडवरील इंपिरियल हौसिंग सोसायटी येथील रहिवाशी सुरेश चंद्रप्रकाश मंत्री वय ५५ हे १५ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास कोर्ट परिसरातून कुणालाही काहीही न सांगा निघून गेल्याने त्यांचे भाऊ हेमंत चंद्रप्रकाश मंत्री यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव शहर पोलीस स्टेशनला रात्री उशिरा हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोना युनूस तडवी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.