धक्कादायक; बसचे ब्रेक फेल… दोन दुचाकीस्वरांसह सहा जणांचा मृत्यू…

0

 

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

नाशिक सिन्नर महामार्गावर गुरूवारी दुपारी राज्य परिवहन महामंडळाची बस, दुचाकी यांच्यात शिंदे टोल नाक्या जवळ विचित्र अपघात झाला. या अपघातात बसने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला असून अपघातानंतर बस अचानक पेटली. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच बसने पेट घेतला. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.

या महामार्गावर शिंदे पळसे गावाजवळ हा अपघात झाला. ब्रेक फेल झाल्याने बसने दुचाकीस्वारांना चिरडलं. या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने प्रवाशांनी धावत्या बसमधून उडी मारली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या अपघातात १० ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सध्या बचावकार्य सुरू आहे. (Shocking; Bus brakes fail… six people die including two bikers…)

Leave A Reply

Your email address will not be published.