शिवकॉलनी ते अजिंठा चौफुली महामार्गासाठी विविध मागण्या…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शिवकॉलनी ते अजिंठा चौफुली दरम्यान होणारे अपघात व प्रदूषणाचा प्रश्न तसेच वरील दुभाजकामध्ये वृक्षारोपण, तसेच अतिक्रम काढणे, रस्ता मोकळा करून पथदिवे, सूचना फलक त्याचबरोबर साईड पट्ट्यांची दुरुस्ती व झेब्रा क्रॉसिंग पट्टे आखावे जेणेकरून एक्सीडेंट होणार नाही. या विविध उपाययोजना करून सुविधा मिळाव्यात यासाठी जन उद्योग ग्राहक कल्याण परिषद महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष जळगाव कार्याध्यक्ष डॉ. शरीफ बागवान यांनी न्हाई (NHAI) चे डेपोटी मॅनेजर स्वातंत्र्य गौरव यांना भेटून समस्यावर चर्चा केली व त्यांना यावेळी निवेदन देण्यात आले. (Various demands for Highway)

दरम्यान न्हाई चे डेप्युटी व्यवस्थापक स्वातंत्र्य गौरव यांनी लवकरात लवकर समस्या दूर करण्याचे काम केले जाईल व आपणास सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी जन उद्योग कल्याण परिषदेचे वतीने शाहिद खान, डॉ, अतुल पाटील, डॉ. संजीव खारे, नाझीम निसार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.