Saturday, January 28, 2023

भीषण अपघातात पत्नीसह पोलीस अधिकारी जागीच ठार…(व्हिडीओ)

- Advertisement -

 

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क:

पोलीस इन्स्पेक्टर आपल्या पत्नीसह आपल्या गाडीने जात असताना एक भीषण अपघात घडला. (A police officer along with his wife died on the spot in a horrific accident) या अपघातात पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरला भरधाव कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरच्या मागच्या बाजूमध्ये घुसली. यावेळी झालेल्या धडकेत पती-पत्नीला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये घटना घडली. सिंदगी येथील सर्कल इन्स्पेक्टर रवी उकुंडा, वय 43 आणि त्यांची पत्नी मधू, वय 40, यांच्यावर या अपघातात काळाने घाला घातला.

- Advertisement -

कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील असलेले रवी उकुंडा हे कलबुर्गीच्या सिंदगी इथं पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत होते. अल्पावधिकच लोकाभिमुख अधिकारी म्हणून त्यांची ओळख बनली होती. त्यांच्यासोबत झालेल्या या दुर्दैवी घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते आहे.

रवी हे पत्नीसह स्विफ्ट डिझायर कारमधून जात होते. समोर असलेला कंटेनर रस्त्याच्या कडेला पार्क केलेला आहे, याचा रवी यांना अंदाज आला नाही. त्यांचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांनी भरधाव वेगाने कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. या अपघातात रवी यांची कार कंटेनरच्या मागील भागात पेचून अडकली गेली.

या अपघाताची तीव्रता इतकी जबर होती, की कारमधील दाम्पत्याचा जागीच जीव गेला. कारच्या समोरच्या भागाची काच, बोनेट, समोरची दोन्ही चाकं, याला मोठा फटका बसला होता. या अपघातानंतरही अपघातग्रस्त कार कंटेनरपासून वेगळी करतानाही प्रयत्नांची शर्थ करावी लागली होती. बुधवारी सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास केला जातो आहे.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे